Ad will apear here
Next
रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात आरोग्यरक्षा सेवा अभियान; डॉक्टरांना सहभागी होण्याचे आवाहन


पुणे :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे २७ एप्रिल २०२०पासून पुणे शहरातील वंचित वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आरोग्यरक्षा सेवा अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यात व्यापक तपासणी मोहिमेचा समावेश असून, गरजूंना औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुणे महानगरपालिका, पोलिस प्रशासनाच्या मदतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबविलेल्या #PunekarAgainstCorona या व्यापक अभियानाचा हा एक भाग आहे.
 
या अभियानात पुणे महानगरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या आजारपणावर (कोरोनासंबंधी उपचार वगळता) उपचार करण्यासाठी मोठ्या संख्येने डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर, रा. स्व. संघाने हाती घेतलेल्या या अभियानात समाजातील सर्व डॉक्टरांनी आपला वेळ संकटात सापडलेल्या समाजबांधवांसाठी द्यावा, असे आवाहन रा. स्व. संघातर्फे करण्यात आले आहे.

डॉक्टरांनी उपलब्ध वेळ कळवल्यास रा. स्व. संघ जनकल्याण समिती आपल्या घराजवळील वस्तीमध्ये सुरू असणाऱ्या आरोग्यसेवेत आपल्याला जोडून घेईल, असे कळवण्यात आले आहे. यासाठी डॉक्टरांनी केवळ https://forms.gle/nSxbMYLi7f23NWLPA या लिंकवर आपली नोंदणी करायची आहे. महेश मानेकर (९९६०७ ७३०१२) व मुग्धा वाघ (९५५२४ ५१०७७) यांच्याशी संपर्क साधूनही नोंदणी करता येईल.

अभियानात सहभागी होणार असलेल्या डॉक्टरांना रुग्ण तपासणीसाठीची संपूर्ण आधुनिक यंत्रणा दिली जाणार असून, त्यांच्या आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे.  प्रत्येक डॉक्टरने प्रत्येक टप्प्यात तीन दिवसांची सेवा देणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्येक डॉक्टरला विश्रांती मिळू शकेल अशी रचना करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांच्या विलगीकरणाचीदेखील स्वतंत्र सोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येणार आहे. 

पुणे महानगरातील नागरिक, लहान मुले आणि वंचित वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) राहणाऱ्या समाजातील ३१ हजारांहून अधिक गरजू कुटुंबांपर्यंत रा. स्व. संघातर्फे शिधा आणि भोजन पोहचवले गेले आहे. हा उपक्रम अजूनही सुरूच आहे. परंतु आता त्यांच्या आरोग्याच्या समस्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. तेव्हा वंचित वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) आरोग्यसेवा देण्यासाठी डॉक्टरांनी मोठ्या संख्येने पुढे यावे आणि लोकांची डॉक्टरविषयी असणारी श्रद्धा व विश्वास दृढ करावा, असे आवाहन रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व जनकल्याण समितीचे पुणे महानगर कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZPGCL
Similar Posts
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.
जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता!; पुण्यातील करोनामुक्त कुटुंबाच्या भावना पुणे : ‘करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही बरे झालो,’ अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली
करोनाला गांभीर्याने घ्या : डॉ. अविनाश भोंडवे (मार्गदर्शनपर व्हिडिओ) पुणे : ‘विविध माध्यमांतून सर्वत्र करोनाविषयक माहिती उपलब्ध होत असूनही, अजूनही बरेचसे लोक सुरक्षेचे उपाय पाळताना दिसत नाहीत,’ याबद्दल खंत व्यक्त करून ‘करोनाला गांभीर्याने घ्या,’ असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले. पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने
पुण्यातील शाळांमध्ये वाजणार वॉटर बेल पुणे : मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी आता शाळांमध्ये वॉटर बेल वाजणार आहे. शाळेत खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात मुले पाणी प्यायचे विसरतात, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी पाणी शरीरात जाते. यामुळे अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. ते टाळण्यासाठी आता शाळांमध्ये ठराविक काळानंतर मुलांना पाणी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language